वाळवा क्रांती - आष्टा
सांगली जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य झुंजारराव पाटील यांनी आष्टा व परिसरातील अनेक गणेश मंडळांच्या आरती करीत त्यांनी साधला मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद त्यांच्या भेटीने विधानसभा निवडणुकीत होणार मोठा फायदा अशी चर्चा सुरू आहे. आष्टा शहरांमध्ये नुकतेच होऊन गेलेल्या गणेश उत्सवामध्ये सांगली जिल्हा नियोजन समितीचे सदस्य झुंजारराव पाटील यांनी आष्टा शहरातील अनेक गणेश मंडळांना भेटी देत त्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यां शी राजकीय सामाजिक कृषी शैक्षणिक सहकार क्षेत्राबाबत संवाद साधला तसेच आमदार जयंत पाटील यांनी आष्टा शहरात दिलेल्या मंडळांना भेटी वेळी झुंजारराव पाटील यांनी त्यांच्यासोबत अनेक गणेश मंडळाच्या आरत्याही केल्या झुंजारराव पाटील हे मुसुद्दी राजकीय व्यक्तिमत्व असल्याने तसेच त्यांचा जनसंपर्क चांगला आहे तसेच सहकार, शिक्षण, राजकीय, कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी स्वताची वेगळी ओळख निर्माण केली आहे तसेच वाचन चळवळ टिकवण्यासाठी त्यांच्या वाचनालयाच्या वतीने वाचन चळवळ सुरू आहे. आष्टा नगर परिषद निवडणूक असो की इस्लामपूर विधानसभा निवडणूक असो या निवडणुकीत झुंजारराव पाटील यांच्या मताशी सहमत असणारे मतदार निर्माण केले आहे. या जनसंपर्काचा फायदा भविष्यात आमदार जयंत पाटील व आष्टा व हर विकास आघाडीला नक्कीच होणार असल्याचे दिसून येत आहे शहरातील विविध भागांतील गणेश मंडळाच्या आरतीसाठी त्यांच्या कन्या डॉक्टर वंदनाताई पाटील यांनी देखील विविध गणेश मंडळाच्या आरती केल्या आहेत एकूणच आमदार जयंत पाटील व स्व आ विलासराव शिंदे यांच्या विचाराचे कार्यकर्ते तयार करण्याचे काम झुंजारराव पाटील करीत असल्याचे दिसून येत आहे