वाळवा क्रांती. आष्टा - आष्टा शहरांमध्ये भाजपचे नाचक्कीभा रतीय जनता पार्टीच्या वतीने आष्टा शहरामध्ये विविध विकास कामाचं उद्घाटन व मटन मार्केटचे लोकार्पणचा कार्यक्रम घेतला होता या कार्यक्रमाला पालकमंत्री सुरेश खाडे ,खासदार धैर्यशील माने, सदाभाऊ खोत ,भीमराव माने यांनी फिरविले कार्यक्रमाला पाठ भाजपचा फुसका बार गेला असल्याचे टीका आष्टा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शिवाजी राजे चोरमले यांनी केली यावेळी ते म्हणाले मटन मार्केटच्या इमारतीचा ठराव डिसेंबर 2020 च्या काळात आष्टा नगरपालिकेवर आष्टा शहर विकास आघाडीचे पालिकेवर सत्ता होते ते काम नामदार जयंतरावजी पाटील यांनी मंजूर केले होते. उद्घाटन प्रञिके मध्ये आ जयंतरावजी पाटील यांचे नाव नसल्यामुळे व निमंत्रण नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपचा कार्यक्रम हाणून पाडला व इथून पुढे या शहरांमध्ये हुकूमशाही चालून देणार नाही
असा इशारा शिवाजी चोरमुले यांनी दिला. यावेळी आष्टा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे वैभव दादा शिंदे, संग्राम फडतरे, झुंजारराव पाटील ,विराज शिंदे, दिलीप वग्याणी ,रघुनाथ जाधव, अमित ढोले, माणिक शेळके, अमर शेळके, नाना मोरे राजकेदार कपिल कदम,शकील मुजावर, अंकुश मदने , प्रकाश शिंदे मिरजकर, दत्तात्रय मस्के, जयवंत पाटील यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केली