दानोळी :
दानोळी व परिसरात अज्ञात चोरट्यांची दहशत :-
दानोळी व परिसरात रात्री घराचे दार वाजवणे, रस्त्यावर दगड टाकणे असे प्रकार घडत असल्याने नागरिकांत भीतचे वातावरण निर्माण झाले आहे.असे प्रकार मळा वस्ती आणि गावालगत असलेल्या घरांच्या बाबतीत घडत आहेत. त्यामुळे या घटनांचा छडा लावावा अशी मागणी होत आहे.
दानोळी सह परिसरातील कवठेसार आणि मळा वस्तीत रात्री अपरात्री घराचे दार वाजवणे, घरावर दगड मारणे, रस्त्यावरती दगड टाकून रस्ता अडवण्याचा प्रयत्न करणे. अशा घटना घडत आहेत. त्यामुळे दानोळी कवठेसार परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान काल सोमवारी मध्यरात्री दानोळी - जयसिंगपूर रोडवरील मळा वस्तीत घराचे दार ठोठावले होते.घरात महिला व लहान मुले असल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले. शेजाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी धाव घेतली. पण कोणी आढळले नाही. या प्रकाराने परिसरात विशेषतः मळा वस्तीत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.