देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन झाले होते.अशा पद्धतीने हा पुतळा कोसळणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज आहेत. परंतु झालेले निकृष्ट बांधकाम आणि प्रशासकांनी केलेले दुर्लक्ष यामुळे हे घडलेले आहे.शेकडो वर्षांपूर्वीचे किल्ल्यांचे बुरुज अजूनही सुस्थितीत आहेत. परंतु आठ महिन्यांमध्ये उभा राहिलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो या घटनेचा मी मराठा समाजाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करतो.झालेल्या घटनेची चौकशी होऊन तातडीने कारवाई करावी.असे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभव दादा शिंदे म्हणाले
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव -वैभव दादा शिंदे