आष्टा येथील डॉ.वंदना पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जि.प. शाळा नंबर 9 या शाळेस स्मार्ट टीव्ही भेट


 आष्टा येथील डॉ.वंदना पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जि.प. शाळा नंबर 9 या शाळेस स्मार्ट टीव्ही भेट देऊन मुलांसोबत साजरा करण्यात आला   

      आष्टा - येथील कै. शिवाजीराव पाटील आप्पा यांची नात आणि आष्टा नगरीचे लोकप्रिय माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य झुंजारराव पाटील दादा यांची सुकन्या डॉक्टर वंदना पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा आष्टा नंबर 9 बाजारवाडी या शाळेत स्मार्ट टीव्ही भेट देण्यात आला. वाढदिवसानिमित्त शाळेच्या प्रांगणात डॉक्टर वंदना पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. विद्यार्थ्यांनी वाढदिवसानिमित्त गीत गायन करून शुभेच्छा दिल्या.

          डॉ. वंदना पाटील यांनी नुकतीच बीडीएस ही पदवी प्राप्त केली असून त्या पुढील शिक्षणाची तयारी करत आहेत. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या.जिल्हा परिषद शाळामध्ये गोर गरीब लोकांची मुले शिकत असतात.  नत्यांना ई लर्निग चे ज्ञान प्राप्त होणे गरजेचे आहे. यासाठीच आपल्या वाढदिवसानिमित्त स्मार्ट टीव्ही भेट देण्याचा संकल्प केला. विद्यार्थ्यांनी दातांची निगा राखणे आवश्यक आहे यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या.

       यावेळी बोलताना राजाराम देसावळे  म्हणाले की पाटील कुटुंबियांचे नेहमीच आष्टा नगरीवर प्रेम राहिले आहे. विविध क्षेत्रांमधून पाटील कुटुंब आष्टा नगरीतील लोकांची सेवा करत आले आहेत.जिल्हा परिषद शाळेविषयी त्यांचे काम त्यांचे  उल्लेखनीय आहे. केंद्रप्रमुख जाकीर मुजावर सर म्हणाले की  जिल्हा परिषद शाळांचे  रुपडे पालटत आहे.मॉडेल स्कूल मधून शाळांचा सर्वांगीण  विकास होत आहे. लोकसहभागातून स्मार्ट टीव्ही मिळणे हे उल्लेखनीय बाब आहे. याचा निश्चितच फायदा विद्यार्थ्यांना होईल.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विकास गायकवाड शिवाजीराव पाटील नागरी आप्पा संस्थेचे सचिव सुनील पाटील शाळेच्या माता पालक संघाच्या अध्यक्ष माधुरी पाटील शिवरत्न,शिवतेज महिला बचत गटाच्या अध्यक्षा प्रतिभा देसावळे शाळेच्या मुख्याध्यापिका फरीदा मकानदार शाळेच्या शिक्षिका ज्योत्स्ना कांबळे पालक अश्विनी पाटील, वैष्णवी देसावळे उपस्थित होते.

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर नायकवडी सर यांनी केले तर आभार दयानंद लोखंडे सर यांनी मांनले.