श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आष्टा या संस्थेची 25 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात

 श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आष्टा या संस्थेची 25 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात


पार पडली. सभेच्या अध्यक्षपदी अंकलेश्वर क्रेडिट सोसायटी चे संस्थापक मा.श्री. राजेश चौगुले  उपस्थित होते  प्रमुख पाहुणे

मा.श्री. संग्राम शिंदे सर व मा.श्री. महेश गायकवाड तसेच संस्थेचे संस्थापक मा. श्री. सत्तू ढोले हे उपस्थित होते. यावेळी राजेश चौगुले म्हणाले संस्थेचे २५ वर्षाचे कामकाज उत्तम रीत्या चालले आहे हे अहवाला वरून लक्षात येते.

नवनियुक्त संचालक मंडळ यांच्या कार्यकाळात अतिशय चांगली प्रगती होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.

मा. संग्राम शिंदे म्हणाले ढोले कुटुंबीय हे अध्यात्मिक कुटुंब आहे. संस्थेची शिस्त अतिशय चांगली आहे यामुळे ही संस्था तालुक्यातच नाही तर जिल्ह्यात नावलौकिक मिळवेल.

यावेळी मा.महेश गायकवाड म्हणाले या संस्थेने शहरातील सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी फार मोठे योगदान दिले आहे व सर्व संचालक व सल्लागार यांचे अभिनंदन केले. श्री आनंदराव पाटील यांनी स्वागत प्रस्ताविक केले.श्री. बाळासाहेब सिसाळे यांनी श्रद्धांजली वाचन केले. मॅनेजर श्री. राम चौगुले यांनी सभेचे नोटीस वाचन केले.  यावेळी 

श्री. मदन यादव यांनी वैधानिक लेखापरीक्षण अहवाल वाचन केले. संस्थेचे अहवाल वाचन चेअरमन श्री. श्रीराम ढोले यांनी केले त्याचबरोबर संस्थेने चालू सालात 98 टक्के वसुली केली असून संस्थेच्या सभासदांना 10% लाभांश जाहीर करण्यात आला. यावेळी संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा  व प्रशासकीय सेवेमध्ये असणारे PSI ज्ञानेश्वर घुबडे व STI स्मिता सोलनकर यांचा सन्मान करण्यात आला यावेळी संस्थेचे सल्लागार चेअरमन डॉ. श्री.सतीश बापट व व्हाईस चेअरमन श्री. भगतसिंग खर्डेकर यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी संस्थेच्या माजी चेअरमन सौ.आशा सत्तू ढोले, संस्थेचे संचालक जयदीप आवटी, सौ. पूजा ढोले सौ.सुमन रूकडे सौ.शकुंतला भानुसे, श्री.संजय बबन टकले व चंद्रकांत घुबडे, झांबरे बापू, महादेव माळी सर, अशोक टकले,  शामराव भानुसे, विकास सूर्यवंशी,डॉ. संदीप देसाई, सुजित सूर्यवंशी, निलेश दमामे, चेतन पाटील,चंदनगौडा पाटील सर सौ.इंदू माने, सौ.गावडे मॅडम, सौ.मंगल सिसाळे, सौ शिरगावे. तसेच संस्थेचे सर्व सल्लागार श्री. भालचंद्र कुलकर्णी, श्री.अभिजीत मालगावे,श्री. दत्ता ढोले,श्री.सादिक मुनशी .संस्थेचे हितचिंतक, सभासद मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संदीप कुडचीकर व संचालक अमित जाधव यांनी केले व कार्यक्रमाचे आभार संस्थेचे संचालक प्रमोद नाईक यांनी मानले.